Thursday, January 24, 2013

हजलचे दोन शेर .. धों धों पाणी वहात आहे तिच्या घरी ती नहात आहे . इथे मनाच्या खिडकी मधूनी सारे काही मी पहात आहे

भेजाफ्राय: दिवाळी अंकांची सांस्कृतिक रडकथा

भेजाफ्राय: दिवाळी अंकांची सांस्कृतिक रडकथा


लेख चांगला आहे .  आपण फार थेटपणे मतं मांडलीत . मी सत्तर सालापासून दिवाळी अंक वाचतो. आज दिनांक , समकालीन संस्कृती , अबकडई, हे फार वेगळे अंक असायचे. सोबत , किस्त्रीम , हंस , श्रीदीपलक्ष्मी , विशाखा आणि अलीकडे अंतर्नाद , अक्षर, पुरुषस्पंदन , पुरुषउवाच, ऋतुरंग हेही अंक हटके असायचे . पण आता सगळ्यांना भोवळ आली असे वाटते . हे सारे अंक जिथल्यातिथेच गटांगळ्या खात आहेत . तर काहींनी केव्हाच दम तोडला.असे का व्हावे ?
     - अशोक थोरात . अमरावती.

Monday, August 2, 2010

सांगताही येत नाही......(गझल)

गुपित हे मनातले सांगताही येत नाही
जे मला हवे तुला ते मागताही येत नाही

हसतेस बोलतेस, कधी मधेच तोडतेस
नेमके मनात काय जाणताही येत नाही

हा जसा आहे तसा मी तुझ्या समोर आहे
आव खोट्या सभ्यतेचा आणताही येत नाही

कोवळी नाजूक तू अन प्रित ही तशीच आहे
गुंतले धागे असे की ताणताही येत नाही

तू दिला फोटो तुझा तो मानला होकार मी
फ्रेम केली काळजाची टांगताही येत नाही